Chhagan Bhujbal : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य प्रचंड गाजले होते. शाळेत महापुरुषांच्या फोटोंऐवजी सरस्वती, शारदेचे फोटो का लावले जातात, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता.
छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात भाषण दिले होते. यावेळी त्यांनी शाळेत सरस्वतीऐवजी शाहू, फुले यांच्यासारख्या महापुरुषांचे फोटो लावा, असे वक्तव्य केले होते. यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलनही केले होते.
आता यावर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. त्यांच्या वादिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कर्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भुजबळांनी त्यांच्या राजकीय प्रवासाचे वर्णन करण्यासोबतच त्यांच्या या गाजलेल्या वक्तव्यावरही भाष्य केले.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सत्यशोधक समाजाच्या पुस्तकात काय काय लिहिलं आहे हे कोणी वाचलं का? ते वाचा. मी काय म्हणालो. सरस्वती ही विद्येची देवता आहे हे आम्हाला लहानपणापासून सांगत आहेत. मग ५००० वर्ष आम्हाला शूद्र म्हणून का शिकू दिलं नाही? मराठ्यांसह आम्ही सर्व शूद्र. बाकीचे अतिशूद्र. ब्राम्हणांच्या मुलींनीसुद्धा शिकायचं नाही, असे यावेळी नियम असल्याचे त्यांनी सांगितले.
अशावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे पुढे आले. पहिली शाळा निघाली तेव्हा त्यांना ब्राम्हणांनी पाठिंबा दिला. भिडे, चिपळूणकर, भांडारकर या सगळ्या मंडळींनी पाठिंबा दिला. पहिल्या वर्गात सहा मुली आल्या. त्यात चार ब्राम्हणांच्या, एक धनगर आणि एक मराठा अशा मुली होत्या, असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, म्हणून मी सांगितलं, ज्यांनी राज्यक्रांती घडवली, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला आपल्याला खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळालं. फुले, शाहू आंबेडकर, सावित्रीबाई, भाऊराव पाटील, अण्णासाहेब कर्वे या सगळ्या मंडळींनी आपल्याला शिकवलं. यांची पूजा करा. परंतु, त्यांनतर दुसऱ्या दिवसापासून ट्रोलिंग सुरु झालं.
तसेच छगन भुजबळ म्हणाले की, मी सरस्वतीपूजेला नाही कुठं म्हटलं. १० वेळा पूजा करा पण ती आपल्या घरात करा. आमच्या घरातसुद्धा देवीची पूजा करतात. परंतु, शाळेमध्ये लहानपणापासून या महापुरुषांचा इतिहास त्यांना सांगा. त्यांचं काम त्यांना सांगा. म्हणजे त्यांना कळेल की, या शिक्षणासाठी या लोकांनी काय केलं असेल आणि आपल्याला काय करायचं आहे. यावरून किती ट्रॉलिंग केलं गेलं, असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Chagan bhujbal : छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मुख्यमंत्री असते, उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं मशाल चिन्हांसोबतचं हे भावनिक पत्रक होतयं व्हायरल; काय आहे नेमकं प्रकरण वाचा
Ajit Pawar : त्याचा पक्षाशी संबंध नाही; छगन भुजबळांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांनी झटकले हात
Chhagan Bhujbal : शाळांमध्ये सरस्वती ऐवजी शाहु फुले आंबेडकारांचे फोटो लावा; छगन भुजबळांची जाहीर मागणी