जामिनावर सुटलेला आहात जास्त बोलु नका, नाहीतर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

नुकताच पंढरपुर मंगळवेढा पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. तर बंगालच्याही विधानसभा निवडणूकीचाही निकाल जाहीर झाला आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला आहे.

आता याच निवडणूकींच्या पार्श्वभुमीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टिका केली होती. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे.

छगन भुजबळांनी पंढरपुर निवडणूकीवर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही निर्दोश सुटलेले नाहीत. त्यामुळे फार जास्त बोलू नका अन्यथा महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपुर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे. असे होत नाही. बंगालमधील पराभवाचं वाईट वाटणारच, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

तसेच आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करतो. आम्ही निवडणूका फार गांभीर्याने घेतो. पश्चिम बंगालध्ये पराभव जरी झाला, तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते, हे लक्षात घ्यायला हवे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमुलच्या पारड्यात मतं टाकली. देशात आता भाजप विरुद्ध सगळे अशी परिस्थिती झाली आहे. भाजप विजयी झाला, तर प्रामाणिकपणे कारभार होणार आणि तुमची सर्व प्रकरणे बाहेर काढणार याची भिती असते. त्यामुळे काहीही करा भाजपला पराभुत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंढरपुरमध्ये भाजपने केला राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; भाजपचे समाधान अवताडे विजयी
“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता करेक्ट कार्यक्रम कोणी केला?”
सोनू सूदने टेकले आरोग्य व्यवस्थेपुढे गुडघे;रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी त्यालाही बघावी लागली वाट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.