Share

संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर संजय पवार निवडून आले असते’, छगन भुजबळ स्पष्टच बोलले

राज्यसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल भोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल(Prafull Patel), काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत विजयी झाले आहेत. (chgan bhujabl talk about sanjay raut )

राज्यसभेची सहाव्या जागेची निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्या दृष्टीने फार महत्वाची होती. या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडी आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालावर स्पष्ट मतं व्यक्त केलं आहे. “संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्देवाने महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे १६६ पेक्षा जास्त आमदार आहेत. आम्ही नियोजन करण्यात चुकलो”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “भाजपने दोन उमेदवारांना प्रत्येकी ४८ मते दिली आहेत. पहिली फेरी झाल्यानंतर जया उमेदवाराला जास्त मतं असतात. त्याची मतं इतर उमेदवारांना ट्रान्सफर होतात. भाजपाची मते ट्रान्सफर झाली. पण आमची मते ट्रान्सफर होण्याचा योगच आला नाही.”

“उलट संजय राऊत यांना अडचण होते का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही १७० पेक्षा १८० मतांची व्यवस्था करायला पाहिजे होते. यामध्ये आम्ही कमी पडलो”, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या :-
..आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून शिकण्यासारखं आहे, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
“… त्याच्या बुडावर लाथ मारून हाकालपट्टी केली आहे”, संजय राऊतांवर राजू शेट्टी भडकले
शिवसेनेचा उमेदवार पराभूत होताच संभाजीराजे समर्थकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, राऊत आता कसं वाटतंय…

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now