सध्या आयपीएल(IPL) २०२२ च्या मेगा लिलावाचा थरार सुरू आहे. आयपीएलच्या या लिलावामध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंना प्रचंड पैसा मिळाला आहे. पण काही खेळाडूंना या लिलावात कोणताही खरेदीदार मिळाला नाही. या यादीत काही दिग्गज खेळाडू देखील आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे डावखुरा फलंदाज सुरेश रैना(Suresh Raina) या खेळाडूला आयपीएलच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.(Chennai Super Kings player Suresh Raina not buy in ipl 2022 auction)
या लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या(Chennai Super Kings) या माजी खेळाडूला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. आयपीएल २०२२ च्या लिलावाच्या पहिल्याच दिवशी सुरेश रैनाला मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी डावखुरा फलंदाज सुरेश रैना आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाज होता. पण काही काळ त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नव्हती.
फलंदाज सुरेश रैनाने २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर आयपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये सुरेश रैनाचे प्रदर्शन चांगले होते. तो चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा मुख्य आधारस्तंभ होता. चेन्नई सुपर किंग्ज संघावर लादलेल्या बंदीमुळे गुजरात लायन्स या संघासाठी सुरेश रैनाने दोन हंगाम खेळले.
२०१८ मध्ये सुरेश रैना पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये परतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघासह चार हंगाम खेळल्यानंतर सुरेश रैनाला सोडण्यात आले. यानंतर सुरेश रैना लिलावाचा भाग बनला. २०२२ च्या आयपीएलच्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला कोणताही खरेदीदार सापडला नाही.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ५५२८ धावा आहेत. आयपीएलमध्ये डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने एक शतक आणि ३९ अर्धशतके केली आहेत. २०२२ च्या आयपीएलच्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला देखील कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
फलंदाज स्टीव्ह स्मिथ याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामामध्ये स्टीव्ह स्मिथची कामगिरी निराशाजनक होती. २०२२ च्या आयपीएलच्या लिलावात २ कोटी स्टीव्ह स्मिथची बेसिक किंमत ठरवण्यात आली होती. पण कोणत्याही संघाने स्टीव्ह स्मिथला खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले नाही.
महत्वाच्या बातम्या :-
सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? धक्कादायक खुलाश्याने मनोरंजन क्षेत्रात खळबळ
हिजाब वादावर आता जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, मुलींच्या एका छोटाशा गटाला..
हिजाब वादात आता अभिनेत्री सोनम कपूरची उडी, म्हणाली, शीख तरूण पगडी घालू शकतात मग..