मुंबई | लोकल ही मुंबईची लाइफलाइन मानली जाते. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे लोकल ट्रेन बंद करण्यात आली होती. यानंतर अनलॉक करताना लोकल मर्यादित स्वरूपात चालू करण्यात आली. सर्वांसाठी लोकल प्रवास खुला करताना राज्य सरकारकडून ‘चेन्नई पॅटर्नचा’ विचार सुरु आहे.
दरम्यान, चेन्नई पॅर्टर्ननुसार महिलांना पुर्णवेळ आणि उर्वरित प्रवाशांना दिवसातील ठराविक गर्दीची वेळ वगळता प्रवासाला परवानगी देण्याची शक्याता आहे. चेन्नई रेल्वेप्रमाणेच मुंबई लोकलसाठी नियोजन करण्यात येत आहे. चेन्नई हे पण भारतातील एक मोठे शहर आहे. या शहरातील लोकल रेल्वे तीन टप्प्यावर चालू झालेली आहे. मुंबईतही त्याच प्रमाणे दोन टप्प्यावर लोकल रेल्वे सुरु आहे.
पहिल्या टप्प्यात दोन्हीं शहरात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यानंतरच्या टप्प्यात विनागर्दीच्या वेळेत महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात महिलांना पुर्णवेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेसाठी प्रवास करता येईल.
दरम्यान, मुंबई उपनगर रेल्वे आणि चेन्नई उपनगर रेल्वे यांच्यात पहिल्या दोन टप्प्यावर सारख्याच प्रकारेचे निर्णय घेण्यात आले. तर चेन्नई रेल्वने तिसऱ्या टप्प्यात मर्यादित वेळेत सर्वच सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा देली आली. परंतु मुंबई रेल्वेने याबद्दल आद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
चेन्नई पॅटर्ननुसार रेल्वे चालू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. मुख्यमंत्री याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. अशात मध्य आणि पश्चिम रेल्वेला पूर्ण क्षमतेने गाड्या चालू करण्यासाठी तयार राहण्याच्या सुचना प्रस्तावात करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मुंबई लोकलमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने आखला ‘मास्टर प्लॅन’
मुंबईत लोकल ट्रेन सुरू करण्यासंदर्भात हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश
विराट की अनुष्का; कुणासारखी दिसते ‘विरुष्का’ची लेक? पहा पहिलावहिला सुपरक्यूट फोटो
पोस्टाच्या ‘या’ जबरदस्त योजनेत 100 रुपये गुंतवा आणि व्हा लखपती; जाणून घ्या सविस्तर..