इंडियन प्रीमिअर लिगच्या 15 व्या मोसममधील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटलवर दनदनीत असा विजय मिळविण्यात यश आले आहे. लिगच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जवळपास सगळेच सामने गमावले होते.(chennai-beat-delhi-by-117-runs-comeback–the-playoff-race)
लिगच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र महेंद्रसिगं धोनीच्या हातामध्ये सूत्रे आल्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्जनं 5 पेकी 3 लढतीत विजय मिळवला आहे. पण प्लेऑफच्या दृष्टीने चेन्नई सुपर किंग्जला फार उशीर सुर गवसल्याचे पहायला मिळालं आहे. मात्र त्यांचा विजय हा अन्य संघाचे समीकरण बिघडवणारे ठरत आहे.
दिल्ली कॅपिटल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पण चेन्नई सुपर किंग्जचे सलामीवीर फलंदाज ऋतूराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी 110 धावांची भागीदारी करून चेन्नई सुपर किंग्जसाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर चेन्नईच्या पुढच्या फलंदाजांना फटकेबाजी करणं सोप्पं झालं.
ऋतूराज गायकवाड याने 33 चेंडूत 4 चौकारा व 1 षटकारांसह 41 धावा केल्या. कॉनवे 49 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांसह तो 87 धावांवर बाद झाला. कॉनवे व दुबे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 33 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली व महेंद्रसिगं धोनीच्या अल्पक्षा खेळीमध्ये दमदार खेळीचा ट्रेलर बघायला मिळाला. महेंद्रसिगं धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून निघाल्याचं पहायला मिळालं.
मोईन अलीने दिल्लीच्या दोन षटकात सामना चेन्नईच्या बाजुने फिरवला. मिचेल मार्श (25), रिषभ पंत (21), व अक्षर पटेल (6) या तीन महत्त्वाच्या विकेट घेत अलीने दिल्लीची अवस्था 5 बाद 81 अशी केली. केएस भरत ला अखेर आयपीएल 2022 मध्ये खेळण्याची संधी मिळाली.
डेव्हिड वॉर्नर सोबत तो सलामीला आला आणि दुसऱ्या षटकात दोन चौकार खेचले.पण, सिमरजीत सिंगने कमबॅक करताना चौथ्या चेंडूवर त्याला झेलबाद केले. दरम्यान, दिल्लीचा संपूर्ण संघ 117 धावांवर गडगडला आणि यंदाच्या पर्वातील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. या पराभवामुळे दिल्लीचे प्लेऑफचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
महतवाच्या बातम्या :-
सुरेश रैनाला चेन्नई सुपरकिंग्जने संघात का नाही घेतले? माजी खेळाडूने धोनीचे नाव घेत सांगितले धक्कादायक कारण
टुर्नामेंटमधून चेन्नई बाहेर झाल्यानंतर रविंद्र जडेजा भडकला, सगळ्यांसमोर या गोष्टींना धरले जबाबदार
रोहितला आणि ईशानला झिरोवर आऊट करणारा चेन्नईचा मुकेश चौधरी आहे तरी कोण? वाचा त्याच्याबद्दल..