सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल त्याच काही सांगता येत नाही. काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडिओ इमोशनल (Emotional Video) करणारे. मात्र काही व्हिडिओ नकळत डोळ्यात पाणी आणतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे जो पाहून तुम्हाला देखील प्रचंड राग येईल.
काॅलेजची मुलं असो किंवा मुली अनेकांना हाॅटेलमध्ये (Hotel) किंवा रस्त्यावरील खाऊच्या गाड्यावर जाऊन खाण्याची प्रचंड सवय लागलेली असते. घरच्या स्वच्छ आणि पौष्टिक आहारापेक्षा त्यांना रस्त्यावरच्या खाद्य पदार्थांची ( foods) चव लागलेली असते. पण तुम्ही माहिती आहे का की रस्त्यावरचे खाद्य पदार्थ चविष्ट असले तरी ते शरिरसाठी हानिकारक असतात.
रस्त्यावर लावलेल्या स्टाॅलवरील खाद्या पदार्थ कस बनवले जातात याचा तुम्ही विचार देखील करू शकणार नाही. खाद्य पदार्थ बनवण्यासाठी ते कोणतं तेल वापरतात, कोणत्या प्रकारचे साहित्य वापरतात याची माहिती न घेताच आपण ते खातो. पण यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क खाद्या पदार्थाच्या डिश तो व्यक्ती रस्त्यावर साठलेल्या दुषित पाण्यात( polluted water) धुवून ठेवत आहे. हा व्यक्त अनेकांच्या आयुष्याशी खेळत आहे. त्यामुळे नेटकरी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त करत आहेत.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. नेटकरी हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ 38 हजारहून अधिक लोकांनी बघितला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात एक प्रश्न सतावत आहे. खरंच रस्त्यावर विक्रीसाठी असलेले खाद्यपदार्थ चांगले असतात का? आणि ते खावेत का? हा किळसवाणा प्रकार पाहून अनेकांनी रस्त्यावरील पदार्थ खाण्याची इच्छा होत नसल्याने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सत्तासंघर्षाबाबतची ‘ती’ मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, शिंदेंना दिलासा
- अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहीजे; हीच खरी मराठेशाही ठरेल
- नेहमी शांत संयमी असणारे नितीन गडकरी का संतापले? म्हणाले त्यांना मी सोडणार नाही