जगातील सर्वात स्वस्त फोन गणेश चतुर्थीला येणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

मुंबई । नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी वार्षिक बैठकीत मोठी घोषणा केली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी गुगल आणि जिओ टीमने ‘जिओ फोन नेक्स्ट’ हा नवा फोन विकसित केला असल्याची माहिती दिली आहे. तो कधी येणार याचा दिवस देखील त्यांनी सांगितला आहे.

या बैठकीत ते म्हणाले, गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे.

हा फोन १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दरम्यान बाजारात उपलब्ध होईल. यामुळे आता सर्वांना उत्सुकता लागली आहे. रिलायन्स जिओने गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले, आमचे पुढचे पाऊल गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणार्‍या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होत आहे.

तसेच हा फोन भारतासाठी तयार करण्यात आला असून त्या लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी आहे, जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील. हा फोन हाताळण्यासाठी देखील सोपा आहे. यामुळे तो कोणीही वापरू शकतो.

खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. यामध्ये सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे.

ताज्या बातम्या

कुत्र्याची चेष्टा करणं तरुणाला भोवलं, अतिहुशार मुलाचा कुत्र्याने चावला हात, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: धक्कादायक! बाप मदतीसाठी ओरडत राहिला, लोकांनी केले १३ वर्षीय मुलीचे अपहरण आणि….

थरारक! रस्त्यावर सायकलवरुन पडला तरूण, उठण्याचा प्रयत्न करताच मागून कार आली अन्… पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.