‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक स्कुटर्स, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशभरात पेट्रोलची भाव वाढत आहेत यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्कुटर. आजच्या कामात इलेक्ट्रॉनिक स्कुटरची मागणी वाढत आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता इलेक्ट्रॉनिक स्कुटर पाहायला मिळतील. आज आपण जाणून घेऊयात देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक बाईक्स कोणत्या आहेत.

Ampere V48 LA ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक स्कुटर आहे. हिची किंमत २८ हजार ९०० पासून सुरू होते. ही स्कूटर 48 व्ही -24 केआर लीड अ‍ॅसीट बॅटरीवर चालते. ही स्कुटर २५ किमी प्रतितास वेगाने चालते. ही स्कुटर पूर्ण चार्ज होण्यासाठी ८ ते १० तास लागतात. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कुटर ४५ ते ५० किलोमीटरपर्यंत धावते.

Hero Optima ही स्कुटरसुद्धा एक चांगला पर्याय आहे. प्हिची सुरुवातीची किंमत हिंदुस्थानात ४१ हजार ७७० रुपये इतकी आहे. या स्कुटरलासुद्धा पूर्ण चार्ज होण्यासाठी ८ ते १० तास लागतात. हिची टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रतितास आहे. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कुटर ५० किलोमीटर धावते. या स्कूटरमध्ये २५० वॉट क्षमतेची बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर बसविण्यात आली आहे.

Okinawa Ridge हा इलेक्ट्रॉनिक स्कुटरमधील एक लोकप्रिय ब्रँड आहे. या स्कुटरची सुरुवातीची किंमत ४४ हजार ९९० रुपये इतकी आहे. ही स्कुटर ताशी ६० किलोमीटर प्रतिवेगाने धावू शकते. या स्कुटरलासुध्दा चार्ज होण्यासाठी ८ ते १० तास लागतात.

Bajaj Chetak चेतक हा एक लोकप्रिय आणि जुना ब्रँड आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घरात कंपनीने आपली बजाज चेतक इलेक्ट्रॉनिक बाईक लॉन्च केली जी सध्या खूप विकली जात आहे. या स्कुटरमध्ये 3 KWH क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज झाल्यानंतर ही स्कुटर ९५ किमीपर्यंत धावू शकते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.