शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु(Redisen Blue) या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.(chava organization statement about sanjay raut)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या बहुमत चाचणीसाठी शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार मुंबईला येणार आहेत. शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांवर मुंबईत शिवसैनिकांकडून हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.
यादरम्यान छावा संघटनेने शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. “या आमदारांच्या विरोधात जी भाषा वापरली जात आहे, त्या भाषेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. जर त्यांच्या हातात बांबू असतील, तर आमच्या हातामध्ये तलवारी असतील एवढच त्यांनी लक्षात ठेवावं”, असा इशारा छावा संघटनेने दिला आहे.
आमचे हजारोंच्या संख्येने छावे विमानतळावर या आमदारांच्या रक्षणासाठी असणार आहेत, असे देखील छावा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. आज पुण्यात अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे म्हणाले की, “आज शेतकरी अडचणीत आहेत. राऊतांसारख्या लोकांकडून या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना आवर घातला पाहिजे, अन्यथा या महाराष्ट्रातील मराठा समाज राऊत सारख्या लोकांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.”
छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांचे बंड नसून सर्वसामान्यांसाठी राजकीय क्रांती करण्यास एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यांना सरंक्षण देण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे हजारो कार्यकर्ते विमानतळावर जाणार आहेत. राऊत सारख्या माणसांनी यापुढे मराठ्याबाबत बोलताना थोडंसं भान ठेवावं”, असे छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
१६ वर्ष लहान असलेल्या जावयाच्या प्रेमात पडली सासू; गावकऱ्यांना समजताच उचललं धक्कादायक पाऊल
…तर शिंदेचा पुर्ण प्लॅन फसेल आणि बंडखोर आमदारांचे राजकीय करीअरही उद्धवस्त होईल
..तेव्हा लाखोंची ऑफर मिळूनही अक्षयने शिल्पाबद्दल एक शब्दही तोंडातून काढला नाही, वाचा किस्सा