१३७ दिवसांनी देशात डिझेल(Disel) आणि पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किंमती देखील वाढ केली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्र सरकराने पेट्रोलियम कंपन्यांना जबाबदार धरले आहे. या दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर(Modi Government) निशाणा साधला आहे. चार राज्यात विजय मिळवल्यानंतर भाजपने ही पहिली भेट दिली आहे, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे.(chattisgadh cm statement on petro disel rate)
यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, “भाजप सत्तेत आल्यास पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या घरगुती सिलिंडरच्या किमती वाढतील, असे मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते. इंधन आणि गॅसच्या दरात झालेली वाढ ही भाजपने चार राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर देशातील जनतेला दिलेली पहिली भेट आहे”, असे भूपेश बघेल म्हणाले आहेत.
यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत इंधन दरवाढीवरून भाजपला टोला लगावला होता. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले की, “गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवरील ‘लॉकडाऊन’ हटवण्यात आले आहे. आता सरकार सातत्याने किंमतीचा ‘विकास’ करणार आहे. महागाईच्या महासाथीबद्दल पंतप्रधानांना विचारल्यास ते थाळ्या वाजवण्यास सांगतील.”
https://twitter.com/RahulGandhi/status/1506158299309244417?s=20&t=xepP-Nh2-ElNPa6EmKRVfA
मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६० ते ८० पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशातील भोपाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुर या शहरात पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.
मुंबईत आज पेट्रोलचे दर १११.६७ रुपये आहेत. तर डिझेलचे दर ९५.८५ रुपये झाले आहेत. देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीवरून देखील छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना छत्तीसगड सरकारचे मॉडेल स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
https://twitter.com/bhupeshbaghel/status/1506200781225328641?s=20&t=xepP-Nh2-ElNPa6EmKRVfA
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “एक युद्ध बेरोजगारीविरोधात… मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की CMIE च्या आकडेवारीनुसार, आज छत्तीसगडमध्ये केवळ १.७% बेरोजगारी दर आहे, तर देशातील बेरोजगारीचा दर ७.४% आहे. देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी, देशाच्या हितासाठी छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारचे मॉडेल स्वीकारले पाहिजे”, असे ट्विट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘मिस्ट्री फ्रेंड’सोबत दिसली शाहरुख खानची मुलगी सुहाना; पापाराझींना पाहताच केले असे काही की..
बुलेटप्रेमींसाठी गुड न्युज! भन्नाट फिचर्ससह येतेय नवीन बुलेट ३५०; फिचर्स वाचून खुष व्हाल
तारक मेहतामध्ये दयाबेन न येण्याचं खरं कारण आलं समोर, स्वत: जेठालालने केला मोठा खुलासा