Share

“शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही”, संभाजीराजे छत्रपतींनी केला खुलासा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिलं आहे. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीबाबत देखील विधान केलं होतं.(chatrpati shivaji maharaj Samadhi was not built by Lokmanya Tilak”, reveals Sambhaji Raje Chhatrapati)

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलं होतं. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये”, असा खोचक टोला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी राज ठाकरेंच्या सभेतील विधानाचा खरपूस समाचार घेतला. “छत्रपतींचा वंशज या नात्याने मी अधिकृत सांगू इच्छितो की शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही”, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “राज ठाकरे यांचं वक्तव्य इतिहासाला धरून नाही हे स्पष्ट सांगतो. राज ठाकरे यांनी या विषयाचा नीट अभ्यास करावा. एखाद्या जबाबदार नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे”, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार आहे.

त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या दिल्लीत आहेत. कार्यकाळ संपल्यानंतर पुढील भूमिका काय असणार आहे? याबाबतचा खुलासा खासदार संभाजीराजे छत्रपती ६ मे नंतर करणार आहेत. “पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे. पत्रकार परिषद घेऊन नंतर मी ते जाहीर करणार आहे”, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अनेक इतिहासकारांनी राज ठाकरे यांचा हा दावा खोडून काढला आहे. “टिळकांना राजकारणात ओढलं जातंय. कोणत्याही पुराव्याशिवाय लोक काहीही बोलत आहेत. शिवरायांची समाधी बांधल्याचा टिळक कुटुंबीयांचा दावा नाही”, असे लोकमान्य टिळकांचे पणतू कुणाल टिळक यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
..तर त्याच मैदानावर सभा घेणार, त्यापेक्षा जास्त गर्दी जमवणार, अन् त्याच भाषेत राज ठाकरेंना उत्तर देणार
मुंबईत कलम १४४ लागू; पोलिसांचे मनसे, हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ मुंबई सोडण्याचे आदेश
”जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला येतील ते परत जाणार नाहीत”

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now