भारतात ३३ कोटी देव आहेत पण एकातही ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता नाही; शार्ली हेब्दोची टीका

नवी दिल्ली | पैगंबरांवरील कार्टुन काढल्याने चर्चेत आलेले फ्रान्सचे मॅगझिन ‘शार्ली हेब्दो’ पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी त्यांनी भारतातील ऑक्सिजन तुटवड्यावर कार्टूनच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेमुळे सोशल मीडियावर भारतातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शार्ली हेब्दोने या कार्टूनमध्ये हिंदू देवतांची संख्या सांगून एकही देव ऑक्सिजन बनवू शकत नसल्याची टीका केली आहे. मॅगझिनने कोविडच्या संकटावरून हिंदू देवी-देवतांचा अवमान केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मॅगझिनविरोधात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

भारतात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची टीका करणारे कार्टुन २८ एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आले होते. यामध्ये भारतात जमिनीवर पडून लोक ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत असं दाखविण्यात आलं आहे. याशिवाय त्यात हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवण्यात आली. ३३ कोटी देवी-देवता, पण एकातही ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता नाही अशा आशयाचे कॅप्शन देत परिस्थितीवर मॅगझिनने टीका केली आहे.

शार्ली हेब्दोचे हे कार्टुन समोर आल्यानंतर भारतातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांनी हे कार्टुन अवमानकारक असल्याचे सांगून शार्ली हेब्दोवर बंदीची मागणी केली आहे. तर काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखल देत या कार्टुनचं समर्थन केलं आहे.

शार्ली हेब्दोच्या या कार्टूनवर नेटकरी भिडल्याचे दिसून येत आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये माणिक जॉली यांनी ट्विट करत म्हटले आहे, आमच्याकडे ३३० कोटी देव आहेत. हिंमत न हारण्याचं ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि फ्रेंच नागरिकांचा सन्मान करतो. चिंता करू नका तुमच्या कार्यालयावर किंवा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला जाणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील ब्रजेश कलप्पा यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा शार्ली हेब्दोने इस्लामविरोधातील कार्टुन तयार केलं होतं. तेव्हा भाजपच्या आयटी सेलने आनंदोत्सव साजरा केला होता. आता काय करणार? असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
उत्तरप्रदेशात कोरोना चाचण्या निगेटीव्ह येण्यामागे आहे सरकारचा हा ‘झोल’; वाचून तुम्हीही हादराल
ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या उपचारासाठी दोघा मित्रांनी दोन दिवसात जमा केले ३० लाख
तरुणीला वडिलांसाठी हवे होते ऑक्सिजन सिलिंडर; शेजाऱ्याने ठेवली घृणास्पद मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.