मोठी बातमी! टीआरपी घोटाळा प्रकरणी आरोपपत्र सादर, अर्णब गोस्वामी आरोपी घोषित

मुंबई । टीआरपी घोटाळा प्रकरण सध्या भरपूर प्रमाण गाजत असून, याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक देखील करण्यात आली होती. आता अर्णब गोस्वामी यांना अखेर आरोपी घोषित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आपले पुरवणी आरोपपत्र मंगळवारी कोर्टापुढे सादर केले.

टीआरपी घोटाळा प्रकरणी दाखल एफआयआर आणि आरोपपत्रातही नाव नसताना अर्णब गोस्वामी आणि एआरजी मीडियाविरोधात कधीपर्यंत चौकशी करणार आहात? आणखी किती काळ त्यांना केवळ संशयित आरोपी म्हणून ठेवणार आहात? असे सवाल करत हायकोर्टाने १७ मार्च २०२१ रोजी अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून दिलासा दिलेला आहे.

कारण पहिल्या तीन महिन्यांच्या तपासात मुंबई पोलिसांकडे गोस्वामी यांच्याविरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे या कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णब गोस्वीमींसह एआरजी आऊटलेअर समुहाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देत हा तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे चौकशीसाठी देण्याची मागणीही याचिकेत केली आहे.

हा गुन्हा निव्वळ राजकीय हेतून प्रेरीत असून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली दाखल केल्याचाही याचिकेत आरोप आहे. याशिवाय मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची यासंदर्भातील पत्रकार परिषद ही निव्वळ ‘बार्क’च्या अहवालावर आधारीत होती. मुंबई पोलिसांकडे कोणताही स्वतंत्र पुरावा उपलब्ध नव्हता, असा आरोप अर्णब गोस्वामींच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.

मात्र, हा हजारो कोटींचा घोटाळा असून यात तब्बल ३१ हजार कोटींच्या आसपास आर्थिक उलाढाल झाल्याचा आमचा अंदाज असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले होते. टीआरपीच्या आकडेवारीवरच जाहिरातींचा दर ठरलेला असतो अशी माहिती विशेष सरकारी वकिल शिशिर हिरे यांनी हायकोर्टाला दिली होती.

मात्र, आज आरोपपत्रात अर्णब गोस्वामींसह सात नव्या आरोपींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता २२ वर पोहचली आहे. एकूण १९१२ पानांचे हे आरोपपत्र असून अर्णब गोस्वामींसह प्रिया मुखर्जी, शिवा सुब्रमण्यम, अमित दवे, संजय वर्मा, शिवेंद्र मुलधेरकर, रणजित वॉल्टर यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! संपत्तीसाठी भावांकडून माजी मंत्री विजय शिवतारेंचा छळ, मुलीच्या आरोपाने खळबळ

कोरोना योद्ध्याला सलाम! पाठीवर बाळ, हातात कोरोना लसींचा बॉक्स आणि कमरेपर्यंत नदीचे पाणी

संपत्तीच्या बाबतीत मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना मागे टाकते ‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगनची अभिनेत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.