केवळ ८ मिनिटात चार्ज, एकदा चार्ज केली की धावते १००० किमी, या गाडीने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

नवी दिल्ली । सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बाजारात देखील ईलेक्ट्रीक किंवा सीएनजी कारचे तेवढे पर्याय उपलब्ध नसल्याने नव्या कार घेण्यास माघार घेतली आहे. मात्र आता हळूहळू काही गाड्या बाजारात येत आहेत.

सध्या टाटाने इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला गती दिली आहे. सध्या टाटाच्या ताफ्यात दोन ईव्ही कार आहेत. यापैकी नेक्सॉन ईव्ही ही ३१० किमी रेंज देते. तर ह्युंदाईकडे एक कार आहे. जी ४५० किमीची रेंज देते. यामुळे हे देखील पर्याय उपलब्ध आहेत.

ईव्ही कार चार्ज करण्यासाठी ६ ते ८ तास लागतात. आता यावर कडी म्हणून एका कार कंपनीने अशी बॅटरी विकसित केली आहे जी केवळ १० मिनिटांतच बॅटरी चार्ज करणार आहे. यामुळे आपला मोठा फायदा होणार आहे.

चीनची कंपनी Guangzhou Automobile Corporation GAC ग्वांगझू ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन (जीएसी) ने नुकतीच नवीन इलेक्ट्रीक कार Aion V बाजारात आणली आहे. या कारमध्ये ग्रॅफीन बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे आपला मोठा फायदा होणार आहे.

या कारची बॅटरी ८ मिनिटांत ८० टक्के चार्ज होते. याची व्हर्जन टेक्नॉलॉजी बॅटरीला वेगाने चार्ज करण्य़ास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की, GAC Aion V इलेक्ट्रीक कार फुल चार्ज झाली की १००० किमी एवढे मोठे अंतर कापू शकते.

यामुळे येत्या काळात पेट्रोल, डिझेलच्या कारना नवा चांगला पर्याय मिळेल हे संकेत आहेत. येत्या काही वर्षांत १००० किमी ड्रायव्हिंग रेजच्या कार रस्त्यांवर धावताना दिसतील. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये मोठे बदल बघायला मिळतील.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांचा लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या लग्न करणार, पण…

“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात पॉवर, शिवसेनेत माज असायलाच हवा”

कुंपनच शेत खातय! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन, वाळू उपसा करणाऱ्यांना करत होता मदत..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.