बिग ब्रेकींग! पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह यांची निवड, राज्याला मिळणार पहिला दलित मुख्यमंत्री

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. आता पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. हरीश रावत यांनी ट्वीट केले की चरणजीत सिंह चन्नी यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे आणि ते पंजाबचे नवीन मुख्यमंत्री असतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. चरणजीत यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे.

काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत होती. आता पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट केले आहे की चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाबच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. एकमताने निवड झाल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे.

काही काळापूर्वीपर्यंत सुखजिंदरसिंग रंधावा यांचे नाव पुढे जात होते, परंतु चन्नीच्या नावाची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली. चरणजीत सिंह चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर ते राज्यपालांना भेटण्यासाठी चंदीगड येथील राजभवनाकडे रवाना झाले. नवज्योतसिंग सिद्धू आणि हरीश रावत हेही त्याच्यासोबत दिसून आले आहे.

चरणजित सिंग चन्नी हे पंजाबमध्ये काँग्रेसचा दलित चेहरा मानले जातात. कॅप्टन सरकारमध्ये असण्याव्यतिरिक्त त्यांना विरोधी पक्षात राहण्याचा अनुभव आहे. पंजाबचे राजकारण पाहणाऱ्यांना विश्वास आहे की, चरणजीत सिंह यांच्या माध्यमातून काँग्रेसचा दलित लोकसंख्यावर प्रभाव पडेल.

राज्यातील दलित लोकांची संख्या लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के आहे, एक व्होट बँक जी गेल्या निवडणुकांमध्ये विखुरलेली दिसली. अशा परिस्थितीत दलितांच्या विखुरलेल्या मतांना एकत्र करण्याचा काँग्रेसचा विचार दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवणार, त्यांचा हा शेवटचा स्टंट असेल”
धक्कादायक! कर्म पूजेदरम्यान विसर्जनासाठी गेलेल्या ७ मुलींचा तलावात बुडून मृत्यू
साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये आले वीरमरण; १० महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.