कोरोना नियमात मोठे बदल, राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर, ‘या’ जिल्ह्यांत लॉकडाऊन उठवले…

मुंबई । राज्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. असे असताना आता पूर्णतः लॉकडाऊन हटविण्यात आलेला नाही. मात्र यामध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. आता राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीअंतर्गत राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध जैसे थे ठेवण्यात येणार आहेत.

इतर जिल्ह्यांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. देशात काही राज्यांमध्ये तिसरी लाट सुरू होताना दिसून आली आहे. यामध्ये केरळमध्ये कोरोनाची मोठी रुग्णसंख्या समोर आली आहे. यामुळे सर्व राज्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पालघर, सोलापूर, रत्नागिरीत, बीड, रायगड, अहमदनगर या जिल्ह्यात नियम कायम ठेवण्यात आले आहेत. या जिल्ह्यात कोरोना कमी जास्त होत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच या काळात येणाऱ्या गणेशोत्सव आणि इतर सण साजरे करताना नियम लागू केले आहेत. यामुळे साध्या पद्धतीने साजरे करण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अकरा जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यात सूट देण्यात आली आहे.

यामध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्यास परवानगी. शनिवार दुपारी ३ पर्यंत सर्व दुकाने, माॅल्स खुले राहणार, रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने राहणार सुरू राहणार. खासगी आणि शासकीय कार्यालये संपूर्ण क्षमतेने खुली राहणार, गर्दीच्या ठिकाणी नियमावली पाळावी लागणार.

तसेच उद्याने, बगीचे याशिवाय मैदानातही खेळता येणार ब्युटी पार्लर, हेअर सलून आदी दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत खुली राहतील. सिनेमागृह, मस्टिप्लेक्स मात्र अद्याप बंदच राहतील. हाॅटेल्स दुपारी ४ पर्यंत ५० टक्क्यांनी खुली राहतील. विकेंडला मात्र बंद असून केवळ पार्सल सेवा सुरू राहतील.

असे असताना मात्र लोकल बंदच राहणार आहे. याबाबत कोणताच उल्लेख केला नसल्याने लोकल सेवा बंद राहतील असे समोर आले आहे.लोकल सुरू करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. मात्र याबाबत दिलासा मिळाला नाही.

ताज्या बातम्या

सामान्यांचा देवदूत सोनू सूद बनला ऑलिम्पिक मूवमेंटचा ब्रँड एम्बेसेडर; म्हणाला संधीच सोन करणार

आम्हाला बोलावले नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही, चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा

शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्टचा बोर्ड फोडला, आता अदानी समूहाने घेतला मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.