Share

महाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थानातही सत्ताबदल? आॅपरेशन लोटसला सुरवात…

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात(Maharashtra) राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Change of power Rajasthan after Maharashtra? Operation Lotus begins)

शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. भाजप शिंदे गटातील आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्ये देखील ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार चिंतेत आले आहे. भाजप काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नाराजीचा फायदा घेऊन राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यामध्ये मतभेद आहेत. दोन वर्षांपूर्वी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराजी दर्शवत बंड पुकारलं होतं.

काँग्रेस नेते सचिन पायलट काही आमदारांना सोबत घेऊन हरियाणातील एका हॉटेलमध्ये गेले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी सचिन पायलट राजस्थान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर होते. तसेच सचिन पायलट राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील होते.

पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. राजस्थानमधील काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सचिन पायलट यांच्या पाठीशी होते. सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

यामध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना यश मिळाले होते. सचिन पायलट पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये आले होते. पण अजूनही सचिन पायलट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. याच गोष्टीचा फायदा भाजपने घेण्याचे ठरवले आहे. भाजप ‘ऑपरेशन लोटस’ राबवून राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेला आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
..म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो भाजपमध्ये या, आयुष्य सुखकर होईल; नितेश राणेंनी दिले होते आमंत्रण
पुणेकरांचा नाद नाय! विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now