सगळं बाजूला ठेवा आणि आधी गाडीची नंबरप्लेट बदला; नाहीतर होईल जबर दंड; जाणून घ्या नवा नियम

मुंबई । वाहनांबाबत अनेक बदल सध्या करण्यात आले आहेत. तसेच अनेक नियम देखील लागू करण्यात आले आहेत. असे असताना आता अनेक राज्यात हाय सिक्योरिटी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे आपल्याला वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे. नाहीतर अनेक अडचणी येऊ शकतात.

हाय सिक्योरिटी नंबर प्लेटवर होलोग्राम स्टिकर असतो, यावर वाहनाचे इंजिन आणि चेसिस नंबर असतो. यामुळे वाहनाची सुरक्षा आणि सुविधा याची हाताळणी व्यवस्थित होते. यामध्ये नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.

यासाठी दोन पोर्टल तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीला bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. खाजगीवर क्लिक केल्यास पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, CNG आणि CNG+ पेट्रोल असे पर्याय निवडावे लागतील.

गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल. डिझेल गाड्यांसाठी नारंगी रंगाचा स्टिकर लावणे गरजेचे आहे. वाहनांची ओळख पटावी हा या मागचा हेतू आहे.

याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आणि इंधनानुसार रंगीत स्टिकर लावणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीला अनेक प्रयत्नांनंतरही याचा सकारात्मक परिणाम न झाल्याने, परिवहन विभागाने याबाबत सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चारचाकी वाहनांवरच सक्ती असणार आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.