राज्य झोपेत असताना सरकार पडणार; चंद्रकांत पाटील यांनी केला गौप्यस्फोट

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकारण पेटलेले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी नरेंद्र मोदी भेटीसाठी वेळ देत नसल्याचे म्हटले होते. त्यावरून आता मोठा वादंग उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुरुवार दिनांक २७ मेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पण वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्देशून महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडेल असे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मराठा समाजासाठी कोणीही आंदोलन केले तरी त्याला भाजप पाठींबा देईल असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी यावेळी महविकास आघाडीवर पण टीका केली आहे.

त्यांनी यावेळी महाविकास आघाडीबद्दल बोलताना म्हटले आहे की, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. नाहीतर स्वातंत्र्यानंतर यांचे राज्य असून पण यांना आजतागायत आरक्षण देता आलेले नाही.

यांनी जर मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर आरक्षणासंदर्भात सर्व मुद्दे धूसर होत जातील. राज्यांपेक्षा केंद्र सरकार आरक्षण मिळवूंद येताना पुनर्विचार याचिका पण दाखल करेल असे त्यांनी यावेळी यात म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टी मराठा समाजाला आरक्षण देण्यात महत्वाचा पक्ष होता आणि आता परत मराठा आरक्षणाला जे कोणी आंदोलन करतील त्यांना आम्ही पाठींबा देणार असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
भाऊ कदम यांची लाडकी लेक दिसते खूपच सुंदर, सौंदर्यात मराठी अभिनेत्रींना देते टक्कर; पहा फोटो

हॉस्पिटलमध्ये तोडफोड करायला गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी काठी तुटेपर्यंत चोपले; पहा व्हिडीओ

किस केल्यामुळे मिकासिंगला जेलची हवा खायला घालणाऱ्या राखी सावंतने आता त्यालाच मारली मिठी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.