एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार का? पहा भाजपचे नेते काय म्हणताहेत..

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आता लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच केवळ अधिकृत घोषणा बाकी असून पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खडसेंवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘खडसे हे अतिशय समजुतदार राजकारणी आहेत. आमच्यासाठी ते नेते असल्याने पक्षाची हानी होईल, अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. प्रसारमाध्यमातूनच या चर्चा सुरू आहेत. पण खडसे पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजगी दूर होईल,’ असे पाटील म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. राजकारणात प्रत्येकाची काही ना काही अपेक्षा असते. आपल्याला सन्मान मिळावा अशीही अपेक्षा असू शकते,’ असे मत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्हा सर्वांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण देखील नीट समजते.

याचबरोबर मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी नाथाभाऊंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन, असे देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या
तुम्हाला माहीत नसेल पण शाहरूखने एकदा दोनदा नाही तर चक्क तीन वेळा लग्न केले आहे; वाचा पुर्ण किस्सा
..म्हणून आमीर खान बाॅलीवूडपासून दूर राहतो; स्वत: आमीरनेच सांगीतली बाॅलीवूडची काळी बाजू
पानटपरी चालवनारे भाऊ कदम अख्ख्या महाराष्ट्राचे हास्यसम्राट झाले; पहा कसा झाला हा चमत्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.