मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा! सरकारनं मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरक्षणाचा मुद्दावरून विरोधक ठाकरे सरकारवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार असल्याचे पाटील म्हणाले आहेत. तसेच आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे, असे पाटील म्हणले.

तसेच याबाबत पुढे पाटील म्हणतात, ‘राज्य सरकारने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचं आश्वासनही दिलं होते.’

मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा समाज मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी चांगलाच आक्रमक झालेला आहे. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्यसरकार काहीच प्रयत्न करीत नाही, असा गंभीर आरोप मराठा समाजाकडून केला जात आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
बिहारमध्ये महागठबंधन करणार भाजप जेडीयूचा सुपडा साफ; वाचा विविध एक्झीट पोल
“पोलिसांनी मला जबरदस्तीनं काहीतरी द्रव्य पाजलं त्यामुळे माझा श्वास कोंडला”
MI च्या विजयानंतर रोहितने असे काहीतरी केले की तुम्हीही म्हणाल कॅप्टन असावा तर असा!
‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्रीसाठी वेडा झाला होता बाहुबली प्रभास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.