“देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात”

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.

ते म्हणाले की, आमचे देवेंद्र दबंग नेते आहेत. ते १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे यांच्यासारखं नाहीये. त्यांना काय चालू आहे हेच माहिती नसतं आणि नंतर म्हणतात की मला माहीतच नाही काय चालू आहे.

पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. सोपं नाही ते, खूप वर्षांनंतर असं झालं आहे. तेव्हा देखील शिवसेनेने खूप त्रास दिला आहे. तेव्हा देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र सरकार स्थापन करायचं आणि असे प्रयत्नही झाले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, हसन मुश्रीफ म्हणाले होते की, चंद्रकांत दादांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती पण ती मी नाकारली. त्यांनतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता.

यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, हसन मुश्रीफ यांना कोणतीही ऑफर दिली नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफ यांनी हा सगळा ड्रामा बंद करावा.

माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच ते असेही म्हणाले की, काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार. पण ते दोन नेते कोण आहेत? हे त्यांनी सांगितले नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.