“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर दुसरीकडे देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात म्हटलंय की, ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुधका दुध, पानीका पानी करावं अशी मागणी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याचाच धागा पकडत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ;अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव असल्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली. पत्रात व्हाट्सअॅप-एसएमएसची भाषा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच चार दिवसांनी पत्र प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा केला आहे.

वाचा काय म्हंटलं आहे अनिल देशमुखांनी पत्रात…
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.

सत्यमेव जयते! परमबीर सिंह द्वारा मुझपर लगाए गए आरापों की जांच करवाकर “दूध का दूध, पानी का पानी” करने कि मांग मैंने माननीय मुख्यमंत्री महोदय से करी थी। अगर वे जांच के आदेश देते हैं तो मै उसका स्वागत करूंगा।

महत्त्वाच्या बातम्या 

देवमाणूस! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना, आता गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार

नाद खुळा! सरकारी नोकरी सोडून सुरु केली ही शेती आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये

मोदी सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेमुळे हा तरुण झाला मालामाल, महिन्याला कमवतोय लाखो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.