‘हातावर पोट असलेल्या एक कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा’

मुंबई : “राज्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. या लॉकडाऊनला आमचा विरोध असणार असून लॉकडाउन हा पर्याय नाही, ‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन जारी करण्याआधी हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार देण्याचीही मागणी केली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रमाणात ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे लागेल.’

“तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जा. त्या ठिकाणी प्रत्येक जण काही ना काही तरी करुनच पोट भरतो. त्यांना तुम्ही काहीही दिलं नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत,” असे म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

दरम्यान, राज्यामध्ये रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यावरुनही पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आता नाईट कर्फ्यु लागू केला. ते आम्हाला मान्य आहे. रात्री कोणाला फिरायचे असते. ज्यांना फिरायचं असतं ते तुमच्या सोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवं असतं. सर्व सामन्यांना सातच्या आत घरात चालतं,’ असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

दारूच्या नशेत असताना मध्यरात्री अजय देवगणला मारहाण? हा व्हिडीओ खरा की खोटा

लॉकडाऊनला भाजपाचा तीव्र विरोध; ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई पोलिसातील ‘त्या’ अधिकाऱ्याकडे केस गेल्याने वाझे घाबरले आणि त्यांनी मनसुखला संपवले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.