चंद्रकांत पाटील ही भाजपने मराठा समाजाशी केलेली गद्दारी नाही का? गंभीर पुरावे उघड करत ‘या’ नेत्याचा आरोप

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकारण पेटलेले आहे. मराठा आरक्षण कोण देत यावरूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद चालू आहेत. एकदा राज्य केंद्राकडे बोट दाखवते तर कधी केंद्र राज्याकडे असा लपाछपीचा डाव चालू आहे.

याच मुद्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही कागदपत्रे ट्विट केली आहेत. त्यांनी ट्विट केलेल्या कागदपत्रांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. #SaveMeritSaveNation भाजपा व संघाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.

यावरून सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालाय रद्द केला.

यामुळे राजकीय वादाची ठिणगी महाराष्ट्रात पडली आहे. राज्य सरकारकडून व्यवस्थित मांडणी न केल्यामुळे मराठा आरक्षण उच्च न्यायायालयात रद्द झाले असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. पण सचिन सावंत यांनी एक वेगळीच बाजू समजून सांगितली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भाजपाशी आणि संघाशी संबंधित असल्याचं गौप्यस्फोट केला आहे. सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे ट्विट केली आहेत.

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?” असा आरोप करत अवनत यांनी भाजवर वार केला आहे.

ताज्या बातम्या
संभाजीराजेंनी फडणवीसांनी हात जोडून सांगीतलं तुझं माझं करू नका, समाजासाठी एकत्र या; वाचा काय ठरलं भेटीत

संभाजीराजेंनी फडणवीसांनी हात जोडून सांगीतलं तुझं माझं करू नका, समाजासाठी एकत्र या; वाचा काय ठरलं भेटीत

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याचे भाजपशी थेट संबंध; सर्वच पुरावे झाले उघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.