‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत जरी मारली’…चंद्रकांत दादांच्या वक्तव्याने शिवसेना खवळली?

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय वाद सुरू होते हा वाद संपेना. नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री यांना थोबाडीत लगवण्याची भाषा केली होती, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटून उठले होते.

तो वाद शमतो ना शमतो यातच आता पुन्हा एकदा थोबाडीत मारणे या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समोरा समोर आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार संदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.

भरचौकात उद्धव ठाकरेंनी आपल्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही, असे महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका नेत्याने वक्तव्य केल्याचा दावा चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केला आहे.

पुढे ते म्हणाले, आम्हाला अनपेक्षितपणे सत्ता मिळाली असल्याने आम्हाला प्रत्यक्षात थोबाडीत मारली तरी शांत राहू, अगदी अनपेक्षतपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू शकत नाही असंही एका बड्या नेत्याने म्हटल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

याचसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांना अफवा पसरवण्याची सवय आहे अशा शब्दात चंद्रकांत दादा पाटील यांच्या टीकेस सडेतोड उत्तर दिले. पुढे संजय राऊत म्हणाले,” ते एक मंत्री कोन? असं हवेत गोळीबार करून चालत नाही.

कोणी कोणाच्या थोबाडीत मारत नाही चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील तर अशा प्रकारच्या अफवा पसरवून त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा. पण मी वारंवार सांगतोय हे सरकार अजून तीन वर्ष उत्तम प्रकारे चालेल. आणि त्यानंतरही महाविकास आघाडी सत्तेवर येईल,त्याबद्दल निश्चित रहा,”.

गेले काही दिवस पाहता महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीला चालले असून एकमेकांच्या श्रीमुखात लगावण्याची भाषा लोकप्रतिनिधींना साजेशी नसून याने महाराष्ट्रातील राजकारणाची बदनामी होत असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

 

महत्वाच्या बातम्या
फक्त ५८,००० मध्ये मिळणारी ‘ही’ बाइक करेल पेट्रोलच्या सर्व चिंता दूर…जाणून घ्या फिचर्स आणि फायदे
कंगना राणौतच्या ‘थलायवी’ने आतापर्यंत किती पैसे कमावले आहेत? आकडा ऐकून धक्का बसेल
ठाकरे सरकारच्या डर्टी ११ मध्ये मंत्री हसन मुश्रीफही, १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
‘…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला’; संजय राठोड यांचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.