Share

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: कुठे फडणवीस, कुठे सपकाळ! सूर्याला दिवा दाखवताय का? बावनकुळेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला

Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात नागपुरात काढलेल्या मोर्चावर टीका केली. बावनकुळे म्हणाले की, हा मोर्चा समाजाची दिशाभूल करण्यासाठी ठरवलेला होता. २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला अध्यादेश फक्त हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) संदर्भात लागू असून, तो मराठवाड्यापर्यंत मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा अध्यादेश लागू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे म्हणाले की, ओबीसी समाजाने आरक्षण बचाव मोर्चा काढला; परंतु तो षडयंत्राचा भाग आहे. खऱ्या कुणबी व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, हेच उद्दिष्ट असावे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण गेले होते; पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आल्यावर हे आरक्षण पुन्हा मिळाले आणि ओबीसींसाठी महामंडळ स्थापन करण्यात आले. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काँग्रेस (Congress) चे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) होते, मात्र ते सत्तेत असताना काही कार्य झाले नाही. “आम्ही मात्र सगळे दिले आणि सुप्रीम कोर्टात भांडलो,” असे त्यांनी सांगितले.

बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “पुढील काळात ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. ओबीसी मोर्चा नियोजित होता आणि सरकार अजूनही स्पष्टीकरण देण्यासाठी तयार आहे. एकही चुकीचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही, खऱ्या वंशावळ असलेल्यालाच प्रमाणपत्र मिळेल. काँग्रेसने समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी टोला लगावला.”

बावनकुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांचेही नाव घेतले आणि म्हणाले, “सपकाळ यांची बोलण्याची उंची नाही, फक्त मीडिया त्यांची दखल घेते. कुठे देवेंद्र फडणवीस, कुठे सपकाळ? त्यांची तुलनेत काहीच उंची नाही. फडणवीसांवर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे.” काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसाठी ही टीका कोपरखळी ठरली, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now