Chandrashekhar Bawankule : चंद्रकांत पाटील हे नव्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर त्यांची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागली होती. नुकताच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कोण असणार याचा खुलासा झाला आहे.
आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच भाजपकडून याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेलं प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाणार याची सर्वत्र चर्चा होती. त्यांच्या जागी आता चंद्रशेकर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय मुंबईच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांचे पदही रिकामे होते. त्यांच्यानंतर आता आशिष शेलार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी चेहऱ्याची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याआधी बावनकुळे यांचे विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांनतर आता त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
Pankaja Munde : ‘विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यात माझाच हात’, पंकजा मुडेंच्या कबूलीने राजका रणात खळबळ
BJP : सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूका झाल्यास भाजपचा पराभव नक्की; धक्कादायक आकडेवारी आली समोर
Pankaja Munde : मंंत्रिमंंडळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी केली व्यक्त; म्हणाल्या, मी पात्र…
राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; भाऊ म्हणाला, डॉक्टर…