चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपमध्ये येण्याची आॅफर; मुश्रीफांचा सणसणाटी गौप्यस्फोट

किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार होते मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने किरीट सोमय्या यांनी कराड इथे पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा उघड केला. गडहिंग्लज अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत.

मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांचा वापर त्यांनी फक्त टूल म्हणून केलेला आहे.

चंद्रकांत पाटलांना सातत्याने चिंता वाटते की आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजपा भुईसपाट झालेला आहे. हा कोणी भुईसपाट केला? तर हसन मुश्रीफ याला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी गेल्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीत येण्याची सुद्धा विनंती केली होती. मात्र पवार एके पवार म्हणत मी ती विनंती मान्य केली नाही” असं ते म्हणाले

दरम्यान यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि आयकर विभागाकडे देणार असल्याची माहिती देताना या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार अस ही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या
दीपिका पदुकोणचा विना मेकअपचा फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का, पी. व्ही. सिंधूनेही केली चेष्टा
श्रीमंतांच्या गाडीला ८ एअरबॅग, आणि सर्वसामान्यांच्या २ एअरबॅग का? गडकरींनी कंपन्यांना खडसावले
८० वर्षे वय असतानाही शिवरायांच्या दर्शनासाठी रायगडावर पायी येणाऱ्या शेलार मामांचे निधन, संभाजीराजे भावूक
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या मागे ईडी लागतेय, भाजपचे सर्व नेते काय धुतलेल्या तांदळासारखे आहेत काय?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.