चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी दिले युतीचे संकेत? केले सूचक विधान…

मुंबई । गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या. यामध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. यामुळे शिवसेना भाजपची युती संपुष्टात आली. यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला.

आता मात्र दोन वर्षांनी शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा युतीची चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. यामुळे आता पुन्हा हे पक्ष एकत्र येणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक विधान केले. यामुळे ही चर्चा रंगली आहे. यावेळी राजकीय जुगलबंदी बघायला मिळाली.

उद्धव ठाकरे म्हणाले, व्यासपीठावरचे आजी माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचे स्वागत. यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असे असताना काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असे विधान केले होते. यामुळे आता लवकरच हे पक्ष पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार का? हे येणाऱ्या काळात समजणार आहे. मात्र असे झाल्यास पुन्हा एकदा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.