पुणे पदवीधरमध्ये भाजपला भगदाड; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी जोरात

मुंबई | पुण्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपने हातातली आणखी एक जागा गमावली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य पुरुषोत्तम बरडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यंदा पुण्याची लढत प्रतिष्ठेची झाली होती.

तर दुसरीकडे नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला खिंडार..  
पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला होता.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८  हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

हिंमत असेल तर…
पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

पुढे ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण झालं असून राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटलांचे प्रचंड धक्कादायक खुलासे
पुणे ते नागपूर भाजप भूईसपाट! विधान परिषदेत महाविकासआघाडीचा डंका
विधानपरिषदेतील दारूण पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात; हिंमत असेल तर…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.