धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…

मुंबई | बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेने मागे घेतली आहे.

यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसे ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रय़त्न आहे तो निंदनीय आहे,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘मुंडेंच्या बाबतीत जी घटना घडली त्यामध्ये भाजपाने सुरुवातीपासूनच तक्रार खरी की खोटी असल्याचं ठरवून मग निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. पण वारंवार आम्ही रेणू शर्मा व्यत्तिरिक्त पीडिता करुणा शर्मा यांच्याबद्दल बोला असे सांगत होतो.’

पुढे ते म्हणाले की, ‘”पण शिताफीने रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली म्हणजे ते निर्दोष आहेत, त्यांना क्लीन चीट द्या, बदनामी झाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे काय चाललंय काय? महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?” असे म्हणतान पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘…म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते’
धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिले आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत उडाली खळबळ; म्हणाले…
सरकारच्या अडचणीत वाढ! कायदा स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; उचलले मोठे पाऊल
…म्हणून रेणू शर्मांकडून बला.त्काराची तक्रार मागे, भाजप नेत्याने केलेल्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.