विधानपरिषदेतील दारूण पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात; हिंमत असेल तर…

मुंबई | पुणे पदवीधर हा भाजपचा हक्काचा असणारा मतदारसंघ या निवडणुकीत त्यांच्या हातून निसटला आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे.

तर दुसरीकडे नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. यामुळे नागपूरमध्ये भापला धक्का बसला आहे.

याचाच धागा पकडत पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकटे लढा असे आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केले आहे.

पुढे ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण झालं असून राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार…
पुणे पदवीधर मतदारसंघात गेल्या ३० वर्षांत भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिनिधित्व केले. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर यंदा राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
रेखा जरे ह.त्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानेच दिली सुपारी!
भाजपची झाली नाचक्की; भाजपचे आयटी सेल प्रमुखांचे ट्विट फेक
आता फक्त १२१ रुपये भरा आणि मुलीच्या लग्नाला मिळवा २७ लाख रुपये, जाणून घ्या..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.