…तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल- चंद्रकांत पाटील

 

मुंबई | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रथम वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूरमधून पळून आलोय अशी टीका माझ्यावर केली जाते. पण मी भीत नाही. कोल्हापूरमधून आजही पोटनिवडणूक लढवायला मी तयार आहे, निवडून नाही आलो तर हिमालयात जाईल, असे चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

कोल्हापूरमधील कोणत्याही मतदार संघातून एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोट निवडणूक लढवावी. मी निवडणूक लढवायला तयार आहे. निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे, तसेच मी आजपर्यंत कुठलीही निवडणूक हरलेली नाही, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार कोथरूड निवडणूक लढवण्याचे नक्की झाले होते. तसेच त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पद असल्याने पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते, पण निर्णय झाला होता, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच कोथरूडमध्ये माझी उमेदवारी जाहीर होताच, अनेक प्रकारचे वाद निर्माण करण्यात आले होते. सुरक्षित मतदार संघ ते मराठा-ब्राम्हण असा जातीयवाद निर्माण करण्यात आला होता. सगळीकडून माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात होता, तरीही कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आणि अंबाबाईच्या आशीर्वादामुळे मी निवडून आलो, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रियाला सीबीआयचा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत रियालाच झापले

सुशांत प्रकरणाला वेगळे वळण! ‘या’ व्यक्तीने मुंबई पोलिसांवर केला धक्कादायक आरोप

आरारारारा! बाॅलीवूडची ‘ही’ स्टार अभिनेत्री म्हणतेय मला भूताने झपाटलय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.