“निर्बंध बोलून लॉकडाऊन करण्याचं पाप करत आहात, तुम्ही जनतेची घोर फसवणूक केली आहे”

राज्यासह देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक पाहायला भेटत आहे. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता तज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे आणि राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे आणि काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. सामान्य जनतेपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात सरकारचा विरोध केला जात आहे. त्यामुळे या नियमांमध्ये बदल करण्यात यावेत अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली होती.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर अनेक लोकांनी, व्यापाऱ्यांनी आणि विरोधकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. भाजपनेही या निर्णयाचा निषेध केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोर करण्याच्या नावाखाली अघोषित लॉकडाऊन लावून गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारणाऱ्या या लबाड सरकारचा जाहीर निषेध!

ठाकरे सरकार कसला विचित्र खेळ मांडला आहे? केवळ कठोर निर्बंधांच्या नावाखाली थेट लॉकडाऊनच करत आहात. जनतेची फसवणूक करणारा असा कारभार कदापि सहन केला जाणार नाही. स्वकीयांना सुट आणि कामगार, व्यापारी वर्ग, गोर गरीबांच्या पोटावर लाथ. अजूनही मदतीचे कुठलेही पॅकेज जाहिर केले नाही.

नागरीकांचे पोट कसे भरणार? कोरोनावर नियंत्रण कसं मिळवणार. याबद्दल कसलेही नियोजन नाही. सुरळीत चाललेल्या सामान्य नागरीकांच्या आयुष्याचं तुम्ही वाटोळं करत आहात. निर्बंध बोलून लॉकडाऊन करण्याचं पाप करत आहात. तुम्ही जनतेची घोर फसवणूक केली आहे.

हे हुकुमशाहीचं आणि खोटं बोलण्याचं धोरण आता चालणार नाही. गेल्या वर्षभर तुम्ही सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला आहे. जर हे निर्बंध बदलले नाहीत तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची ताकद ठेवा, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
“मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून सरकारने लॉकडाऊन लावला”
शेतकऱ्याची कमाल! आधुनिक प्रकारे शेती करून कमावतोय वर्षाला ८० लाख रूपये
रोज ग्लासभर कोमट दुधात एक गुळाचा खडा टाकून पिल्याचे फायदे वाचाल तर रोज प्याल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.