‘चौथीची पोरगी पण सांगेल, यांचे काय खरे नाही, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते’

 

मुंबई | राज्यात सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच या मुद्द्यावरून विरोधी पक्ष राज्य सरकारवर टीका करत आहे.

आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचे नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही.

कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तरी त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते, पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

तसेच लॉकडाऊन की अनलॉक अजून कळत नाही. आपले मतभेद आणि गोंधळ संपत नाही. तसेच जेवढे लॉकडाऊनमध्ये कडक नव्हते, त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे.

यामुळे आता लोकांनी नेमके करायचे तरी काय? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.