‘अर्थचक्र फिरवायचे का दोन किमीमध्येच फिरायचे?, ‘भ्रमित ठाकरे’ सरकारने निर्णय घ्यावा’

 

मुंबई | सध्या राज्यात कोरोना संकटावरून सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करत आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे की, अनलॉक? असा प्रश्न विचारत हे ‘भ्रमित ठाकरे’ सरकार आहे, असे म्हणत पाटलांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक ?
अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे.

तसेच पुढे ट्विट करताना, काय ते एकदा ठरवा अर्थचक्र फिरवायचे का दोन किमी मध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या जनतेचा संभ्रम दूर करा, असेही ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ जुलै पर्यंत अनलॉकिंगचे नियम कायम ठेवत, घरापासून फक्त दोन किलोमीटरवर असणाऱ्या बाजारपेठा, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल, असा निर्णय घेतलेला आहे.

या निर्णयामुळे मुंबई पोलिसांनी अनेकांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच याबाबत काँग्रेसनेही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.