लॉकडाऊनला भाजपाचा तीव्र विरोध; ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई : “राज्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. या लॉकडाऊनला आमचा विरोध असणार असून लॉकडाउन हा पर्याय नाही, ‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. पाटील म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रमाणात ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे लागेल.’

तसेच “तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जा. त्या ठिकाणी प्रत्येक जण काही ना काही तरी करुनच पोट भरतो. त्यांना तुम्ही काहीही दिलं नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत,” असे म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

दरम्यान, राज्यामध्ये रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यावरुनही पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आता नाईट कर्फ्यु लागू केला. ते आम्हाला मान्य आहे. रात्री कोणाला फिरायचे असते. ज्यांना फिरायचं असतं ते तुमच्या सोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवं असतं. सर्व सामन्यांना सातच्या आत घरात चालतं,’ असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

असे काय झाले की, जिगरी यार मनोजकुमार आणि प्राणची मैत्री तुटली

देशमुख फॅमिलीचा होळीचा हा भन्नाट व्हिडीओ तुम्ही पाहिला का? पाहून तुम्हीही म्हणाल, मस्त!

ना मास्क ना सोशल डिस्टनसिंग, खासदार नवनीत राणा यांनी धरला ठेका; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.