नीट बोलायचं असतं, चंद्रकांत पाटलांची गोपीचंद पडळकर यांना जाहीर समज…

मुंबई | जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अहिल्याबाई होळकर पुतळा अनावरणप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कठोर शब्दांत टीका केली.

आता स्वपक्षातील नेत्यानेच पडळकर यांचे कान टोचले आहेत. “मागेही गोपीचंद यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह विधान केले हिते. त्यावेळी त्यांना फडणवीस यांनी समजावून सांगितले होते. आताही त्यांना आम्ही जाहीर सांगतोय की जे ते बोलायचं असतं. पण नीट बोलायचं असतं,” अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समज दिली.

शरद पवारांवर टीका करताना काय म्हणाले होते पडळकर?
या उद्घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचे पडळकर यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचेही यावेळी बोलताना पडळकर म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या
‘पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का?’
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गाईच्या दूध खरेदी दरात वाढ
व्हा अधिक स्मार्ट! मोबाइलमध्येच बाळगा आपले आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.