पुणे | भाजप युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नरेद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे कौतूक करत नरेंद्र मोदी मुस्लिम समाजाविरोधात नसल्याचं वकत्व्य केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
भाजपाची रणरागिणी कडाडली; ‘संजय राठोडांची चौकशी होत नाही, तोपर्यंत…’
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले की, देशाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना आमचा विरोध राहणारच. पण सर्व मुस्लिमांना विरोध असण्याचं कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एपीजे अब्दूल कलाम यांना राष्ट्रपती केलं. कर्तुत्ववान व्यक्ती म्हणून त्यांना मानाचं स्थान दिलं. मुस्लिम समाजाचे होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
“मी गांजाही विकत होतो, तू येतोस का चिलीम लावायला”
तसेच ते पुढे म्हणाले की, बिहार निवडणूकीमध्ये मुस्लिमबहुल भागांमध्ये भारतीय जनता पक्षाला अनेक जागा मिळाल्या आहेत. मोदींनी केलेली कामं पाहून मुस्लिम महिलांनी रांग लावून भारतीय जनता पक्षाला मतदान केले आहे.
तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय; अमृता फडणवीसांनी कोणाला केले लक्ष?
या कार्यक्रमाला भाजप आमदार भीमराव तापकीर, भाजपयुमोचे विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, पुणे शहराध्यक्ष बापू मानकर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रोहित पवारांच्या नगरच्या सभेची महाराष्ट्रभर चर्चा का? वाचा सविस्तर