Chandrakant Khaire : भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी नुकत्याच एका भाषणात शिवसेनाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पडळकर म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत. २०१९ मध्ये जनतेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी स्पष्ट बहुमत दिलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यासोबत अनैसर्गिक युती केली.”
त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट)चे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं असून, पडळकरांना खडेबोल सुनावले आहेत.
“पडळकरचं थोबाड काळं करावं लागेल”
आपल्या परखड आणि रोखठोक शैलीत बोलताना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“पडळकर म्हणतो उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत? उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं घाणेरडं वक्तव्य करणं म्हणजे मर्यादांचा भंग आहे. पडळकर असं बोलतो म्हणजे त्याचं थोबाड काळं करावं लागेल.”
खैरे यांनी पडळकरांवर वैयक्तिक टीकाही केली. ते पुढे म्हणाले, “पडळकर हा थर्ड क्लास बडबडया माणूस आहे. त्याला अक्कल आहे का? औकात काय त्याची? एकदम मूर्ख माणूस आहे. जर हा संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) आला, तर सरळ करून टाकू.”
गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त विधान काय होतं?
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एका सभेत बोलताना म्हटलं होतं, “२०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मतं दिली होती. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून सूर्याजी पिसाळसारखं धोकेबाज काम केलं. हे वर्तन महाराष्ट्राशी विश्वासघात करणारं आहे.”
या विधानामुळे ठाकरे गटातील नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावर दिलेलं प्रत्युत्तर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
राज्यात विधानसभा आणि महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचा सूर अधिक तीव्र होताना दिसतो आहे. एकीकडे भाजप आमदार पडळकरांची वादग्रस्त तुलना, तर दुसरीकडे खैरे यांची संतप्त प्रतिक्रिया हे सर्व राजकीय वातावरण तापवत आहेत. आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी टीका-प्रत्यटीका रंगण्याची शक्यता आहे.