Share

Chandrakant Khaire : शिंदेंवर खालच्या शब्दात टिका चंद्रकांत खैरेंना भोवली; गुन्हा दाखल, तुरूंगाची हवा खावी लागणार?

Eknath Shinde Chandrakant Khaire

Chandrakant Khaire : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण शांत होण्याचे नाव घेत नाहीये. रोज आरोप प्रत्यारोपच्या नव नवीन फेऱ्या आपल्या विरोधकांवर डागल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीला आता बराच काळ उलटून गेला आहे. तरीही ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात.

यात ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि विनायक राऊत आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाकडून रामदास कदम आणि दीपक केसरकर ठाकरे गटातील नेत्यांवर टीका करण्यात आघाडीवर आहेत. दोन्ही गटातील नेते आपली बाजू लावून धरताना आतिशय त्वेषात बोलतात.

कधी कधी तर त्यांचाकडून असंवैधानिक भाषेचा वापर पण केला जातो. तर काहीवेळा टीका राजकीय न राहता वयक्तिक पातळीवर पण जाऊन पोहचते. आता मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करणे चंद्रकांत खैरे यांना चांगलेच महागात पडले आहे.

त्यांच्यावर आता मुख्यमंत्र्याचे चरित्र हनन करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी दाखल केला आहे. हा गुन्हा साताऱ्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे चंद्रकांत खैरेच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे यांच्यावर सतत गद्दार आणि खोके असे अनेक अपशब्द वापरले जात होते. पण एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना खैरे यांनी एकनाथ शिंदे यांना ‘लटकून मारले असते’ अश्या शब्दाचा उल्लेख केला.

त्यांच्या याच विधानाचा आधार घेऊन त्यांच्यावर दोन गटात वाद निर्माण करणे, दंग्याला चिथावणी देणे, चरित्र मलीन करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गटात आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : दसरा मेळाव्याला पाण्यासारखा पैसा ओतणाऱ्या शिंदेंची सीबीआय चौकशी होणार? थेट हायकोर्टातून अपडेट
Mulayam Singh: समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे ८२ व्या वर्षी निधन
Uddhav Thackeray : शिवसेना सोडणारे खासदार मला म्हणत होते की पुढच्या निवडणूकीत मोदी…; ठाकरेंचा मोठा खुलासा   

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now