Chandrakant Khaire : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यांनतर भाजपसोबत मिळून त्यांनी आपले सरकार स्थापन केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तसेच शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले.
शिंदे गटाकडून शिवसेनेवर आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी शिवसेना कुणाची याबाबत सध्या वाद सुरु आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला आहे. याबाबतची सुनावणी कोर्टाकडून लांबणीवर टाकण्यात आली आहे.
काल औरंगाबादमधील पैठण येथे एका सभेत बोलत असताना शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संदीपान भुमरेंना प्रत्युत्तर देत मोठे विधान केले आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, “शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि म्हणतात की, साहेब आमचं चुकलं. आम्हाला माफ करा. जवळपास १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजप कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करून आपल्याला आऊट करतील हे आमदारांना कळले आहे. त्यामुळे ते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी संदीपान भुमरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत. ते काहीही बोलतात,” असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी संदीपान भुमरेंवर टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
संदीपान भुमरे यांचा दावा खरा ठरला तर शिवसेनेचे आणखी दोन नवीन गद्दार कोण असणार?, असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आता शिंदे गटातील १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! माजी काँग्रेस आमदार शिवबंधन बांधणार, संतोष बांगर यांना देणार टक्कर
Shah Rukh: एकतर्फी प्रेमात शाहरूखने अंकिताला जिवंत जाळलं, संतप्त लोकांनी केली निदर्शने, वाचा काय घडलं?
Hardik Pandya: यावेळी हार्दिक पांड्याने वाचवलं, पुढच्या वेळी अशी चूक करू नकोस, चाहत्यांनी विराटला फटकारलं
Pankaja Munde : ‘या’ बड्या नेत्याने पंकजा मुंडेंना दिली राष्ट्रवादीत येण्याची ऑफर, म्हणाले, रोहिणी खडसे आल्या तुम्हीही….