पत्नीच्या अपमानाने रडले माजी मुख्यमंत्री; म्हणाले मुख्यमंत्री होईपर्यंत सभागृहात येणार नाही

आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांच्यातील वाद जोरात सुरू आहे. सत्तेत आल्यापासून तेलुगू देसम पक्ष सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर सूडबुद्धीने सरकार चालवत असल्याचा आरोप करत आहे.

अशात चंद्राबाबू यांनी एक प्रतिज्ञा घेतली आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी चंद्राबाबू नायडू यांनी अशी प्रतिज्ञा घेतली आहे, ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी सांगितले की, मी शपथ घेतो की जोपर्यंत त्यांचा पक्ष सत्तेत येत नाही तोपर्यंत मी आंध्र प्रदेश विधानसभेत पाऊल ठेवणार नाही. भावनेने भरलेल्या स्वरात, विरोधी पक्षनेत्याने सभागृहात सांगितले की, सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांकडून मला सतत अपशब्द बोलले जात असल्यामुळे मी दुखावलो आहे.

चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून मी अपमान सहन करत आहे पण शांत राहिलो. आज त्यांनी माझ्या पत्नीलाही टार्गेट केले आहे. मी नेहमीच सन्मानाने जगलो आहे. मी आता प्रत्येक गोष्ट सहन करु शकत नाही. तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नायडूंच्या प्रतिज्ञेला नाटक असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या समर्थकानेही अशीच शपथ घेतली आहे. नायडू यांचे समर्थक श्रीनिवासुलू यांनी आपले अर्धे डोके आणि मिशा मुंडल्या आहेत. जोपर्यंत चंद्राबाबूंचे सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत हे असेच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. टीडीपी नेत्यानेही आपल्या गळ्यात पाटी घातली आणि लोकांना पुन्हा नायडूंना मत द्या आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना सत्तेतून हटवण्यास सांगितले.

सत्ताधारी व्हायएसआर काँग्रेसने निवडणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा श्रीनिवासुलु यांनी केला आहे. मंत्री अनिल कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी नेल्लोर नागरी निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. दुसरीकडे, सत्ताधारी वायएसआरसीपीने हे आरोप ठामपणे फेटाळले आहेत.

दरम्यान, चंद्राबाबूंना गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. राज्यात वायएसआरसीपीचे सरकार स्थापन झाले आणि चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
टाटांच्या ‘या’ शेअरने मालामाल! एका वर्षामध्ये १२ हजारांचे झाले १ लाख रुपये; जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात..
..तरच खड्ड्यातून बाहेर येईल, सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर परमबीर सिंगांचे उत्तर
आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान ठेवा, पवारांविषयी चुकीचे बोलल्यानंतर बापटांनी कार्यकर्त्याला झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.