एक एकरात केली ‘या’ भाजीची लागवड आणि शेतकरी झाला मालामाल

 

अनेकदा आपण नोकरी गावी सोडून स्वता:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल ऐकत असतो, तसेच काही लोक तर शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन पैसे कमवतानाही दिसत असतात.

आज आम्ही तुम्हाला अशा एका शेकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याने सरकारी नोकरी सोडून शेती सुरु केली आहे. इतकेच नाही तर तो फक्त एक एकराच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन लाखो रुपयांची कमाई करत आहे. या शेतकऱ्याचे नाव चंदन कुमार खुंटीया असे आहे.

चंदन हा ओडीसातील गुआलीगोराडा गावात राहतो. त्याने देशातील प्रसिद्ध सरकारी कंपनी स्टील अथॉरीटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची नोकरी सोडून शेती सुरु केली आहे.

२०१४ मध्ये त्याने ही कंपनी सोडून शेती करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला धान्याची शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की ही शेती करुन चांगले पैसे मिळत आहे.

तेव्हा त्यांनी काही भागात भोपळा, कारले, शिमला मिर्च लावण्याचा प्रयोग करुन बघितला. मात्र त्यांना यात काही नफा झाला नाही. त्यामुळे त्यांनी काही कृषि तज्ञांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी चंदन यांना चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी काही सल्ले दिले.

त्यानंतर त्याने भाज्यांचीच शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाज्यासोबतच शेतात तोंडले लावण्याचा निर्णय घेतला. त्यांना तोंडल्याच्या शेतीतून २ लाख रुपयांचा नफा झाला होता. तसेच लॉकडाऊल काळात भाज्यांना चांगला भाव मिळत असल्याने त्यांनी भाज्यांच्या शेतीतूल ३ लाखांचा नफा झाला होता.

आता सध्या ते तोंडल्याची शेती करत आहे, तसेच यातून ते लाखोंची कमाई देखील करत आहे. आता ते शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती तर देताच तसेच त्यासोबतच ते तोंडल्याचे रोपटेही शेतकऱ्यांना कमी किंमतीत विकत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.