परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ सुरूच आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक राज्यांसह राज्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी घरांत, रुग्णालयांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

याबाबत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘कोकण आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या अनेक घाटमाथा असलेल्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

तसेच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात किनारपट्टीलगच्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही रेड अलर्ट जारी केलेला आहे. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा ती तुम्हाला सांगते, जा आणि दरवाजाची कडी लाव; पहा आर्चर काय म्हणतोय विराटला..
अक्षयकुमारने साखरपुड्यानंतर वाऱ्यावर सोडले होते रविनाला; स्वत: रविनानेच सांगीतली आपबिती
..म्हणून त्या दिवशी करिष्माने शाहीद कपूरला सेटवरून हाकलून दिले होते; जाणून घ्या कारण..
भरातलं करीअर सोडून विनोद खन्ना ओशो आश्रमात का गेले होते? अखेर मुलगा अक्षयने केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.