राज्याच्या ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | अरबी समुद्रातील हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

३ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्याला आणि ४ जुलै रोजी रायगड जिल्हयाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन्ही जिल्हयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ३ आणि ४ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

तसेच, राज्याच्या किनारी भागासह संपुर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पाऊस मुसळधार स्वरूपात पडेल. तसेच ४ जुलै रोजी पालघर आणि ठाणे या भागात मुसळधार पाऊस पडेल.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा या ठिकाणी ३,४ आणि ५ जुलै रोजी अतिमुसळधार पाऊस पडेल.

शिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, जून २०२० मध्ये महाराष्ट्रात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.