तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला जोरदार तडाखा; स्टेडियमची झाली अशी अवस्था; पहा फोटो

महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईतही काही प्रमाणात या वादळाचे नुकसान झालेलेपाहायला मिळाले आहे.

मुंबई किनारपट्टीच्या जवळ असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला पण या वादळामुळे नुकसान झाले आहे. या वादळात वानखेडे स्टेडियम मधील एक स्टॅन्ड कोसळलेले पाहायला मिळाले. एका साईट स्क्रीनचे पण काही प्रमाणात नुकसान झालेले आहे.

सोमवार दिनांक 17 मेरोजी मुंबईत दिवसभर वादळी वारा होता. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असल्यामुळे वानखेडे स्टेडियम ला पण या वादळाचा फटका बसला. वानखेडे स्टेडियम मधील या वादळामुळे एका स्क्रीनचे नुकसान झाले आणि ती थेट जमिनीवर कोसळली.

बॅट्समनच्या एकाग्रतेसाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या साईड स्क्रीनचे पण यामुळे नुकसान झाले आहे. वानखेडे स्टेडियम चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे असेच काही फोटो ट्विटरवर पण व्हायरल होताना दिसून आले.

वानखेडे स्टेडियम मधील फोटो पाहून फॅन्स काहीसे नाराज झालेले दिसून आले. त्यांनी आपले दुःख कमेंट मधून व्यक्त केले आहे. चौकी चक्रीवादळ निघून गेल्यानंतर पण मंगळवार दिनांक 18 मे रोजी मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मंगळवारी मंगळवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाचे काळे ढग दाटून आले आहेत. काही ठिकाणी तुरळक सरी बरसत असताना जास्त वेगाने वारे वाहताना दिसून आले आहेत. एकूणच अंदाज पाहता मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या
रविना टंडन झाली आज्जी, तिच्यात आणि मुलीत आहे ११ वर्षाचा फरक; जाणून घ्या पूर्ण किस्सा

सलमान खान माझे कपडे, बूट संभाळायचा, माझ्यामुळेच त्याला काम मिळाले; जॅकी श्राॅफचा गौप्यस्फोट

कोरोना रुग्णांवर आता प्लाझ्मा थेरेपीने उपचार होणार नाही; आयसीएमआर आणि एम्सचा मोठा निर्णय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.