डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर चहलची पत्नी झाली भावूक, लांबलचक पोस्ट लिहित म्हणाली..

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यासोबतच ३७ वर्षीय डिव्हिलियर्सने आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतचे नातेही तोडले.

डिव्हिलियर्सने ट्विटरवर ही घोषणा केली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 114 टेस्ट, 228 वनडे आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. हा एक विलक्षण प्रवास होता पण मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्याने एका निवेदनात म्हटले आहे. एबी डिव्हिलियर्सच्या या निर्णयावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

धनश्री वर्माने लिहिले आहे की, “क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या माझ्या छोट्या प्रवासात तुम्हाला अनेक आश्चर्यकारक कारणांसाठी ओळखल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. जेव्हा क्रिकेटचा विचार केला जातो, तेव्हा तुम्ही फक्त मिस्टर 360 नाही तर एक शानदार व्यक्तिमत्व म्हणून डोळ्यासमोर उभे राहता.

ती पुढे म्हणते की, सर मी तुमच्याकडून आणि तुमच्या कुटुंबाकडून बरच काही शिकले आहे. आज जेव्हा तुम्ही तुमची निवृत्ती जाहीर केली आहे, तेव्हा मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देते. मी तुम्हाला हे तुम्कीहाला हे सांगू इच्छिते की, तुमच्यासोबत खेळलेले तुमचे सहकारी आणि खेळाडूच नाही तर तुमचे चाहते आणि क्रिकेट प्रेक्षक देखील तुमची आठवण काढत राहतील. तुम्ही सर्वांवर जो प्रभाव टाकला आहे. तो नेहमीच पाळला जाईल.

धनश्री वर्माने एबी डिव्हिलियर्सला त्याच्या चमकदार खेळ आणि व्यक्तिमत्त्व लक्षात ठेवून ही दीर्घ पोस्ट लिहिली आहे. याआधी विराट कोहलीनेही एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या निर्णयावर ट्विट केले होते.

एबी डिव्हिलियर्सने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या मोठ्या भावांसोबत घराच्या अंगणात खेळण्यापासून आतापर्यंत मी खेळाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. आता वयाच्या ३७ व्या वर्षी ती ज्योत आता तितकीशी तेजस्वी राहिलेली नाही असे वाटते. मला माहित आहे की माझे आई-वडील, भाऊ, पत्नी डॅनिएल आणि मुलांचा पाठिंबा आणि त्यांनी केलेल्या त्यागशिवाय हे शक्य झाले नसते. मला आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करायचा आहे ज्यामध्ये मी त्यांना प्रथम स्थानी ठेवू शकेन.

महत्वाच्या बातम्या-
सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा
‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’
मोदींच्या निर्णयाला चंद्रकांत पाटलांचा विरोध, म्हणाले कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.